
marathi
Kulttuuri & vapaa-aika
Rajoitettu tarjous
Sitten 7,99 € / kuukausiPeru milloin tahansa.
Lisää Biscuit, Chaha ani Kavita Saha / बिस्कीट, चहा आणि कविता सहा
'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत होतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात. . 'Biscuit, Chahaa aani Kavitaa sahaa' is a programme dedicated to chitchatting and marathi kavita / poetry hosted by Abhishek Dani and Pranav Phadnis, where self-written and other popular are presented. The intention is straightforward - to promote the literary arts and marathi language.
पाऊस, आई व सारे काही / Rains, Mother and everything else/ (पाहुणा: पुरस्कार जगताप)
दुसऱ्या पर्वातील शेवटचे भाग; या वर्षातील हि शेवटची भेट. आणि या खास मुहूर्ताची समाधी साधून अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस बरोबर आहे एक नवा पाहुणा. हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि एक विनम्र माणूस, असा आपण 'पुरस्कार जगताप' ची ओळख सांगू शकतो. या भागात विनोदी गप्पा सुरु तर झाल्या आणि काळात नकळत एक भावनिक रूप या कार्यक्रमाला आलं. या भागातील कविता खालील प्रमाणे: ग्लोबल लोकल - प्रणव फडणीस ती आणि मी - पुरस्कार जगताप आषाढझड - अभिषेक दाणी ती आली, ती राहिली, ती गेली - प्रणव फडणीस तांदूळ - अभिषेक दाणी आई - पुरस्कार जगताप --- 'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात. संपर्क: biscuitchaha@gmail.com
स्वातंत्र्य, अत्रे आणि आषाढ । Freedom, Atre and Monsoons
पर्व २ भाग ४ आज जगभरात भारतीयांनी ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण देशाच्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण दररोज घेतोच. तरीही आता वेळ आहे एका वेगळ्या पातळीवरच्या स्वातंत्र्याची. त्यावर काही सादर केलं आहे. त्यासोबत प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार यांना त्यांच्या जन्मतिथी निमित्त स्मरून त्यावर काही गप्पा झाल्या आहेत. आणि ऑगस्ट मध्ये आषाढ श्रावणावर नाही बोलून कसं चालणार? अशा काही विषयांवर दिलखुलास गप्पा आणि कवितेची मैफिल रंगली. या भागातील कविता खालील प्रमाणे: 1. स्वागत आणि परिचय 2. झेप - अभिषेक दाणी 3. वरचा मजला - प्रणव फडणीस 4. मनाचे श्लोक - केशवकुमार/प्रल्हाद केशव अत्रे (सादरीकरण: अभिषेक दाणी) 5. बालोद्यान - प्रणव फडणीस 6. तांडव - अभिषेक दाणी 7. गरम गरम - प्रणव फडणीस सर्व पूर्व भाग सोईस्कर युट्युब वर बघू शकता https://www.youtube.com/channel/UCR2sTx876mKXOknsw4UGrtg --- 'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात.
महाराष्ट्र, माती, जगणे / Maharashtra, Soil, Living / (पाहुणे: सागर चांदे)
पर्व २ भाग ३ : पाहुणा - सागर चांदे १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला. त्याच महाराष्ट्र देशाला आणि मराठी भाषेला नमन करून हा भाग सुरु झाला. गप्पा आणि कवितां मार्फत या कार्यक्रमाचा प्रवाह पोहोचला तो गुरु ठाकूर च्या 'असे जगावे' या कवितेवर. तत्पश्चात गप्पाने आयुष्य आणि जगणे या विषयावर थोडे मुक्काम मांडला आणि कार्यक्रमाचा शेवट गणपती बाप्पांच्या आठवणीने झाला. या भागातील कविता खालील प्रमाणे: स्वागत आणि परिचय महाराष्ट्र कोणाचा? - अभिषेक दाणी व्यक्तिपूजा - प्रणव फडणीस असे जगावे - गुरु ठाकूर (सादरीकरण: सागर चांदे) हवे तसे जगावे - प्रणव फडणीस रहाटगाडगे - अभिषेक दाणी पर्वा भेटला बाप्पा (सादरीकरण: सागर चांदे) --- 'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात.
भाषा, स्रीवाद, साहित्य / Language, Feminism and Literature (पाहुण्या: नीना जठार)
पर्व २ भाग २: पाहुण्या - नीना जठार गेल्या महिन्याभरात बरेच महत्वाचे दिवस होऊन गेले. त्यातले ह्या उपक्रमासाठी उपयुक्त म्हणजे मराठी राजभाषा दिवस, कवी वि.वा.शिरवाडकर ह्यांचा जन्मदिन, पुण्यतिथी आणि तशीच कवी सुरेश भट ह्यांची पुण्यतिथी आणि राट्रीय महिला दिवस. त्यात आणि कवी कृ.ब.निकुंब ह्यांचे जन्मशताब्दी वर्षीही साजरे होत आहे. ह्याच दिवसांचा आशय घेऊन, आजचा हा भाग गप्पा आणि कवितांमध्ये रंगला. ह्या भागात सौ. नीना जठार कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून लाभल्या. ह्या भागातील कविता खालील प्रमाणे: * स्वागत आणि ओळख * वि.वा.शिरवाडकर आणि सुरेश भट: अभिवादन * भाषा - अभिषेक दाणी * बाईचं दुःख - नीना जठार * ती - प्रणव फडणीस * मी खरी आहे - नीना जठार * कडी - कृ.ब.निकुंब (प्रस्तुती: अभिषेक दाणी) * निद्रा - प्रणव फडणीस 'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात.
प्रेम, नाती आणि इंटरनेट/ Prem, Naati aani Internet (पाहुणे: मंगेश केळकर)
माणूस एक समाजप्रेमी प्राणी आहे. समाज आला म्हणजे नाती आलीच. प्रत्येक नातं म्हणजे भावनांची आणि अनुभवांची नवीन पेटीचा असते. प्रत्येक नात्यात आपली पेटी थोडी रिकामी करतो आणि थोडी नव्याने भरून घेतो. नात्यांवर बोलता बोलता आजचा भाग पृथ्वीच्या प्रेमापासून मैत्रीच्या नसलेल्या नियमांपर्यंत गेला. ह्या भागात मंगेश केळकरशी गप्पा मारत आहेत अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस. ह्या भागातील कविता खालील प्रमाणे: 1. एक अजब लव्हस्टोरी - प्रणव फडणीस 2. वर्गातील रामायण - अभिषेक दाणी 3. कॉलेज कट्टा - मंगेश केळकर 4. इंटरनेट - अभिषेक दाणी 5. जेव्हा बाबा आई होतात - मंगेश केळकर 6. मैत्री - प्रणव फडणीस
Valitse tilauksesi
Rajoitettu tarjous
Premium
Podimon podcastit
Lataa offline-käyttöön
Peru milloin tahansa
1 kuukausi hintaan 1 €
Sitten 7,99 € / kuukausi
Premium
20 tuntia äänikirjoja
Podimon podcastit
Lataa offline-käyttöön
Peru milloin tahansa
30 vrk ilmainen kokeilu
Sitten 9,99 € / month
Premium
100 tuntia äänikirjoja
Podimon podcastit
Lataa offline-käyttöön
Peru milloin tahansa
30 vrk ilmainen kokeilu
Sitten 19,99 € / month
1 kuukausi hintaan 1 €. Sitten 7,99 € / kuukausi. Peru milloin tahansa.