
Marathi
Gratis en Podimo
Starte jetzt und verbinde dich mit deinen Lieblingspodcaster*innen
Mehr Sushil Bambulkar
My expression
लॉक डाउन आणि करोना
जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही ! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही. मागचे काही महिने म्हणजे लॉक डाउन चा काळ खूपच त्रासदायक. बरेचसे मित्र, नातेवाईक गावी गेल्याच्या बातम्या येत होत्या. काय करायचे ते सुचत नव्हतं. पण शेवटी ज्याची भीती वाटतc होती त्या करोना ने गाठलच. हॉस्पिटल मधले ते दिवस संपता संपत नव्हते. एका भयानक संकटातून सुटका झाली. हॉस्पिटल मध्ये भेटलेले डॉक्टर, सिस्टर आणि जेवण पाणी देणारे पी पी इ किट घालून वावरणारे सर्वच जण त्यांचे चेहरे दिसत नव्हते पण ही त्या परमेश्वराचीच रूप होती एवढं मात्र निश्चित . आयुष्यात आलेलं हे एक तुफान च होतं. तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही ! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! गणपती ला गावी जायची इच्छा होती पण मनाला आवर घातला, महामारी च्या काळात आपल्या मुळे कुणाला च त्रास नको ही प्रामाणिक इच्छा. करोना ने काही रिटर्न् तिकीट काढलेले नाही हे रोज वाढणाऱ्या पेशंट वरून कळतेय. हे वाईट दिवस संपणार कसे आणि केव्हा हा रोजचा प्रश्न . माझी नोकरी म्हणजे दर तीन चार वर्षांनी ट्रान्स्फर. विंचवाचे बिराड पाठीवर म्हणतात. या एकाच बाबतीत माझे आणि विंचू यांचे साम्य. त्यामुळे मी जाईन तिथे माझी फेमिली माझ्या सोबत. आणि मार्च पासून घरात अडकून पडलेली बायको आणि मुलगी यांना गावी पाठवायची इच्छा आहे पण नुकत्याच होऊन गेलेल्या माझ्या आजार पणा मुळे मला सोडून गावी जायला तयार नाहीत. आईला भेटायची खूप इच्छा आहे पण प्रवास, कोरंटाईनचा कालावधी आणि नोकरी या सगळ्या चा विचार करता सर्वच अवघड वाटायला लागलेय. माझ्या सारख्या असंख्य स्थलांतरित कामगारांचे हेच दुःख आहे. हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे नकोनकोसे हळवे कातर बोलू काही जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही ! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! ऑफिस साठी निघाल्या पासून परते तोवर दिवसभर मास्क लावून काम करताना श्वास कोंडून जातो. इथून पळून जावंस वाटतं. माझ्या सारख्या किती तरी जणांचा हाच प्रॉब्लेम असेल. केव्हा तरी प्रश्न पडतो आयुष्य खरंच असं असतं का. मनस्थिती खूपच दोलायमान झालीय. पण धीर सोडून जमणार नाही. उद्या ची काळजी आहे त्यामुळे पुढे तर जावेच लागेल. उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन परवा आहे उद्याच नंतर बोलू काही जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही ! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! वावटळ किंवा संकटे जेवढ्या वेगाने येतात तेवढ्या च वेगाने निघून जातील. आपण आश्वासक राहायला हवं. आयुष्याच्या प्रवासात अनेक बरे वाईट प्रसंग आले आणि त्यातून निभावुनही गेलो. खूप काही शिकता आलं. वयाची पन्नाशी पूर्ण झाली. पण अजून काही जबाबदाऱ्या बाकी आहेत. आयुष्याच्या या निर्णायक टप्प्यात प्रवेश करताना आजवर सदैव कृपा दृष्टी ठेवणाऱ्या देवाचे आणि या संपूर्ण प्रवासात भेटलेल्या असंख्य प्रेमळ माणसांबद्दल कृतज्ञता ही शब्दातून व्यक्त करावीच लागेल. शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही ! चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !